फलटण चौफेर दि २४ ऑक्टोबर २०२५
फलटण शहरात रात्री उशिरा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. फलटण मधील एका हॉटेल मध्ये त्या राहत असलेल्या रूमचा दरवाजा ठोठावून सुद्धा तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला त्यांनी प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेची फलटण शहर पोलीस स्थानकात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र ही घटना घडली त्यावेळेस त्या महिला डॉक्टर बरोबर त्या रूममध्ये अजून कोण होते? प्राथमिक माहितीनुसार सदर महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील असून त्या शहरातील एका सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहावयास होत्या या हॉटेल मध्ये नेमक्या कुणासोबत व कधी आल्या होत्या याचा पोलीस शोध घेत आहेत.


